"वा वा, डॉक्टरेट करतोयस का? कुठल्या विषयात?"
"जीओलॉजी मध्ये"
"अच्छा, झुलॉजी!!"
"नाही हो, जीओलॉजी"
"बरं, म्हणजे ते उत्खनन वगैरे! वा वा!"
"नाही नाही, ते आर्कीऑलोजी हो काका.."
"बरं, बरं, म्हणजे ते डायनोसोरची अंडी, ज्वालामुखी वगैरे! आम्ही पाहतो ना डिस्कव्हरी वर. छान छान!"
"नाही म्हणजे...हो म्हणजे...आता कसं सांगू?"
"बरं, मग नक्की विषय काय तुझ्या डॉक्टरेट चा?"
पुढचा संवाद लिहिण्यात खरंच काही अर्थ नाही. या इंग्लिश सिनेमांनी निर्माण केलेला हा घोळ आहे. खरं सांगू का? आमचं काम अत्यंत रुक्ष आणि कंटाळवाणं असतं (पाहणा-यासाठी). गंमत, किंवा काहीतरी adventure म्हणून सोबत येणारे, गावात गेल्यावर बघे गावकरी, हे पाच मिनिटात माघार घेतात असा माझा अनुभव आहे. त्यात मी sedimentologist. जगातले सगळे चक्रम बनवून झाले, तेव्हा देवाने त्यांचा अर्क काढून काही मोजके नमुने निर्माण केले, ते हेच. आमचा कुठला ना कुठला स्क्रू ढिला असतो हे प्रथमदर्शनीच लक्षात येतं. असो. थोड्या टेक्निकल गोष्टी सांगतो, म्हणजे पुढच्या (रटाळ) लिखाणात काही अडायला नको. अजून माहिती हवी असल्यास इथे मिळेल. यापुढे दिलेल्या लिंक अजून माहिती हवी असेल तर खरंच उघडून पहा.
Geologist म्हणजे भूशास्त्रज्ञ. यातले प्रमुख दोन प्रकार म्हणजे फिल्ड geologist आणि lab geologist. दोन्ही प्रकार सारखेच चक्रम असतात. अजून तीन प्रमुख प्रकार म्हणजे igneous (अग्निजन्य), sedimentary (स्तरीत) आणि metamorphic (रूपांतरित) या खडकांवर काम करणारे. पैकी पहिला आणि तिसरा प्रकार हे काय बोलत असतात देव जाणे. यांच्या उड्या मोठ्या. एकदम हजार किलोमीटर जमिनीखाली किंवा थेट मिटीओराईट्स. मी मुख्यत्वे sediments वर काम करतो, आणि फिल्ड आणि lab या दोन्ही प्रकारात मोडतो. आम्ही फार उड्या मारत नाही. आमची धाव surface वर. फार फार तर काही किलोमीटर खाली किंवा समुद्राचा तळ. असो.
आम्ही काळाच्या बाबतीत अत्यंत उदार लोक आहोत. दहा लाख वर्षं म्हणजे अगदी परवा परवाचा काळ. फार जुना काळ म्हणजे तीनशे कोटी वर्षं वगैरे. पृथ्वीचा जन्म झाला चारशे साठ कोटी वर्षांपूर्वी, आणि तेव्हापासून आत्तापर्यंतच्या काळाचे आम्ही चार तुकडे केले आहेत. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, आणि क्वाटरनरी. (खरी नावं जरा गजबज आहेत. फारच कुतूहल असेल तर..)
मी ज्या कालखंडावर काम करतो आहे तो आहे क्वाटरनरी. सुमारे २.६ दशलक्ष ते १०,००० वर्षांपूर्वीचा हा काळ पृथ्वीच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ आहे. आज जी काही जमिनीची रचना आपण पाहतो, तिची पायाभरणी याच काळात झालेली आहे. अनेक 'आईस एजेस' याच काळात येऊन गेली आणि माणसाची उत्क्रांती याच काळात झाली. आज वाहणा-या गंगा, यमुना, नर्मदा या नद्या त्याही काळात वाहत होत्या, आणि त्यांनी आणलेल्या गाळात आजही त्यावेळच्या आठवणी जपलेल्या आहेत.
नीट पाहिलं, तर लक्षात येतं की नर्मदेचा त्यावेळचा (२.६ दशलक्ष वर्षं पूर्वील) परिसर हा एखाद्या आफ्रिकन मैदानासारखा होता. काय काय मिळतं तिच्या गाळात? हत्ती, पाणघोडे, मगरी, गायी, काळवीट, म्हशी यांची हाडं, दात. शंख शिंपले. माणसाची एक कवटी (१९८४ मध्ये डॉ. अरुण सोनाकीया यांना सापडली. भारतातला आदिमानवाचा एकमेव विश्वसनीय पुरावा) झाडांची जुनी, दगड झालेली मुळं. अश्मयुगीन हत्यारं. याशिवाय अनेक वेळा भूजल पातळीत बदल झाल्याच्या, नदीची दिशा बदलल्याच्या खुणा या गाळाच्या खडकांनी जपलेल्या आहेत. नदीला पूर येतो तेव्हा अतिशय बारीक वाळू (फ्लडप्लेन silt) ती आपल्या पात्राच्या बाजूला आणून टाकते. अशा silt चा अफाट विस्तार. म्हणजे अगदी परवा परवा ही नदी कशी जबरदस्त असेल..हिच्या पुरांनी किती वेळा कल्लोळ माजवला असेल..जेव्हा गोटे, वाळू, नदीतून वाहतात तेव्हा त्यांचं एकूण प्रमाण, आकार, रचना यावरून त्या नदीचा वेग, दिशा यांचं अनुमान करता येतं. नदीची वळणं कशी बदलत गेली, तिचं पात्र कसं होतं, सरळ का नागमोडी हे सांगता येतं. हे झालं अगदी वरवरचं. जेव्हा microscope किंवा इलेक्ट्रोन microscope ची दुनिया समोर उघडते तेव्हा अजूनच थक्क व्हायला होतं. लहानशा वाळूच्या कणात माहितीचा समुद्र. नदीतून झालेल्या प्रवासाच्या अगणित खुणा. पाण्यात विरघळलेल्या क्षारांनी उमटवलेले खळगे. दगडाचा 2X2 से.मी आकाराचा तुकडा, त्याचा ठसा त्याच्या सगळ्या प्रवासाची कहाणी सांगतो आहे. वाळूचा एक एक कण आपण कुठून आलो हे सांगतो आहे. झाडांच्या मुळांनी अन्न मिळवताना केलेल्या खटपटी या लहानशा ठशात स्पष्ट दिसतायत. लाखो वर्षांपूर्वी कोसळलेल्या दरडी आजही इथल्या डोंगरपायथ्याशी तशाच आहेत. एक एक गोष्ट अशी उलगडत जाते. नदीचा सारा प्रवास दिसायला लागतो. अनेक बदल. त्या बदलांनी आकारलेलं निसर्गचक्र. या सा-या अफाट पसा-यात मी कुठे आहे? माणूस कुठे आहे? या नदीकाठी दगडाची हत्यारं करणारा माणूस आज नर्मदेवर बांध घालतो आहे, पूल बांधतो आहे. नदीत जसा बदल होत गेला तसा माणसातही. बदललेल्या माणसाने परत नदीत बदल केले. आता पुढचा बदल आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? आज नर्मदेकाठी काम करताना वाळूत पाउल उमटल्यावर सहज विचार येतो, की पुढच्या पुरात या ठशावर वाळूचं पांघरूण घातलं जाईल. काही हजार वर्षांनी कोणीतरी जेव्हा हा वाळूचा दगड फोडेल तेव्हा त्याला तो दिसेल. काय कल्प घडून गेलेलं असेल तोवर? तोवर माणूस असेल का? असला तर ही नदी असेल का? नदी नसली तर माणूस तरी का असेल?

नर्मदामाई अनादीकाळापासून (म्हणजे क्वाटरनरीच्या आधीपासून) वाहते आहे.आजही वाहते आहे. गेली तीन वर्षं मी या नदीमध्ये काम करतो आहे. मध्य प्रदेशातल्या भोवंडून टाकणा-या उन्हात मी फिरलो आहे, इथली सुरेख थंडी मी पहिली आहे. नर्मदेकाठी दिसणारे अप्रतिम सूर्यास्त, काळवीटांचे देखणे कळप मी पहिले आहेत. जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा मी नर्मदेत दिवे सोडलेले आहेत. आईशी खेळावं, दंगामस्ती करावी तसा मी या नदीच्या अंगाखांद्यावर खेळलो आहे, पोहलो आहे. उंच किना-यावरून खालच्या अथांग पात्रात मी अनेकदा उड्या मारल्या आहेत. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथल्या माणसांनी मज वनवाशाला अकारण स्नेह दिला आहे. मी जे काम करतो आहे त्याने त्यांचा काही फायदा नाही. त्यांच्या आयुष्यात या कामाने काहीच फरक पडणार नाही, हे मला आणि त्यांनाही माहित आहे. तरी मी उन्हात थकून बसलेलो असताना कितीकदा यांनी मला पाणी दिलेलं आहे, नको नको म्हणत असताना घरी नेऊन पाहुणचार केलेला आहे. काहीजण केवळ मदत करायची म्हणून माझी जड हातोडी आणि दगड भरलेली bag घेऊन माझ्यासोबत भर उन्हात चालले आहेत. कित्येक परिक्रमावासींनी काहीही न घेता, न मागता माझ्यासाठी तोंडभरून आशीर्वाद दिले आहेत. वाट चुकल्यावर मला बरोबर वाटेवर पोचवायला काहीजण मैलोनमैल चालले आहेत. अनेक जणांनी आलेल्या पाहुण्याला चांगले दगड दाखवायचे म्हणून आपली कामं सोडून मला उत्तम sections दाखवले आहेत. याइथे काम करताना मजसारख्या नास्तिकाच्याही मनात हालचाल व्हावी इतका इथल्या लोकांचा त्यांच्या नर्मदामैय्येवर जीव आहे. न दिसणा-या देवापेक्षा सतत सोबत असलेली नदीच बरी, नाही का?
हा प्रवास काही फार भव्य नाही. मी सामान्य आहे, माझा प्रवासही तसाच छोटा आहे. त्यात काही असामान्य घडणार नाही. पण जे मला न मागता मिळालं आहे त्यानेच माझी झोळी भरून गेली आहे. हा प्रवास अजून संपलेला नाही. संपू नये अशी माझी इच्छा आहे. डॉक्टरेटची एक सुरळी कधी मिळायची ती मिळेल. पण तो या प्रवासाचा शेवट ठरू नये. जिथे तिथे माझे जुळलेले धागे सलग राहावेत म्हणजे झालं...
मस्त रे! फारच रोचक विषय आहे. यावर अजून लिही.
ReplyDeleteभारता होमो इरेक्तस सापडला आहे हे माहित नव्हतं. किंबहुना भारतात या काळातलं संशोधन कुठे चालतं हे ही माहीत नाही. भारतीय पुरातत्वशास्त्र म्हणजे हडप्पा-मोहेंदोजारो आणि सिंधू संस्कृती हेच समीकरण लोकप्रिय आहे.
बाय द वे, लेखामध्ये लिंकचा रंग बदलला तर वाचायला सोपं होईल. सध्या लिंक म्हणजे बोल्ड शब्द असं वाटतं आहे.
राज,
Deleteया विषयावर जितकं लिहावं तितकं कमी. थोडं थोडं लिहित जाईन अधुनमधून.
होमो इरेक्टस हा खरं तर 'होमो इरेक्टस नर्मदेन्सिस' आहे. शिवालिक मधे काही australopithecus मिळाले आहेत, पण 'होमो' हा एकच. क्वाटरनरी मधे डेक्कन पुरातत्वशास्त्र विभागाने उल्लेखनीय काम केलेलं आहे. इतका छान विषय असूनही geologists चंच दुर्लक्ष झालेलं आहे इकडे. असो. पुढे या विषयावर लिहिलं तर जरा सविस्तर (रटाळ) लिहीन.
ब्लॉग वर स्वागत,भेट दिल्याबद्दल आणि कमेन्टबद्दल आभार. अगत्य असो द्यावे!
आणि हो, सांगितल्याप्रमाणे लिंक चा रंग बदलला आहे.
Shevatacha para khup Chaan aahe aani itkya kathin wishayala Marathi madhe lihilyabaddal aabhars...:)
ReplyDeleteSurali sathi shubhechha ...ajun lihit raha ...
अपर्णा,
Deleteप्रतिक्रियेबद्दल खूप आभार. विषय खरंच कठीण आहे, कारण एम्.एस्सी मधे एक दोनजण तरी जोरदार आपटी खातात या विषयात (तेपण पहिल्याच सेमिस्टर मधे!). पण जसा तो उलगडत जातो तशी फारच मजा येते. बघू, जमल्यास अजून थोडं लिहायचं आहे या विषयावर.
सुरळीला थोडा वेळ आहे अजून, आणि खरंच शुभेच्छांची गरज आहे! लिहित जाईनच..
अश्विन सुंदरच !!! छान वाटले नवीन माहिती वाचून...
ReplyDeleteदगडाचा 2X2 से.मी आकाराचा तुकडा वर्षोन वर्षांचा इतिहास सांगतो हे ऐकून आश्चर्य वाटले. अजून ह्या विषयावर माहिती वाचायला आवडेल. ही माहिती सोप्या शब्दात सांगितली म्हणून चांगले वाटतेय.
नर्मदा माईचे गुणगान किती गावे तेवढे कमीच...नशीब तुझे की तुला तिच्या संगतीत राहायला मिळतेय. जमले तर नर्मदेची परिक्रमा नक्की कर.
"न दिसणा-या देवापेक्षा सतत सोबत असलेली नदीच बरी, नाही का? " खरेच ह्या साठी!!!प्लस१
आशीष,
Deleteप्रतिक्रियेबद्दल आभार. दगडाचा 2X2 से.मी आकाराचा ठसा बनवून त्यातून त्या दगडाची सगळी कुंडली मांडणे, याला पेट्रोग्राफी म्हणतात. अत्यंत भरवंशाची पद्धत. बघू, थोडं या विषयावर लिहायचं आहेच. लिहिन काही दिवसात.
नर्मदेत काम करायला मिळालं ते माझं नशीब थोर म्हणून. परिक्रमा तर करायची आहेच, पण अजूनही काही धाडस करावं असा विचार आहे :)
समोर जर वाहती नदी असेल, तर कुठल्या देवाधर्माची खरंच गरज नाही. या भागात काम करताना तर याचा सारखा प्रत्यय येतो.
खूप धन्यवाद! लोभ असावा..
wah..Parikramechya sandarbhat mahiti gola karta karta hee post vachali. khup chhan.
ReplyDeleteNarmadechi dusari baaju... :)
अमित,
Deleteनर्मदेची दुसरी बाजूही तेवढीच interesting आहे! :)
धन्यवाद.
नमस्कार,
ReplyDeleteकुतूहल वाढविणारा लेख.सोप्यापद्धतीने विषयाची माहिती. Ph.D. करिता शुभेच्छा !