हल्ली रोज पुणे विद्यापीठात व्यायाम करायला जातो॰ विद्यापीठात एक सुसज्ज व्यायामशाळा आहे, संध्याकाळी मी जेव्हा व्यायाम करतो, तेव्हा फार कोणी नसतंही तिथे॰ तास-दीड तास व्यायाम झाला की मी गाड़ी काढतो अणि बाहेर पडून घराकडे निघतो ॰ आता खरी गोची असते.... बाहेर पडलो की चौफेर माणसंच माणसं दिसतात...सारखी horn वाजवणारी, सारखी दुस-याला मागे टाकून पुढे जायला धड़पडणारी, जिथे नजर जाईल तिथे किड्या-मुंगीसारखी वळवळणारी.......सगळृया़ माणसांच्या चेह-यावर युद्धाला निघाल्यागत भाव...वाटेत कोणी आला की दात ओठ खाऊन horn वाजवला जातो....आपला वेग कमी झाल्याचा राग, दुस-याकरता काही सेकंद दिल्याचा राग उफाळून येतो...गर्दी, गोंधळ, वाद, मारामारी....आपण माणूसच आहोत का, असं वाटायला लावणारी ही जीवघेणी शर्यत...
मला तर हल्ली आजुबाजूला माणसंच नको झालीयेत॰ आपण आणि एकटे आपण असणे हे केवढं सुख आहे!! फार तर एखादा दोस्त बरोबर...पसारा हवाच कशाला? म्हणून हल्ली संधी मिळाली की पुण्याबाहेर पळतो ...एखादा किल्ला गाठावा, वर जाऊन जंगल पहावं.....परत आल्यावर घाण आहेच आजुबाजूला...येऊन बुडायचं त्या घाणीत ...weekend ला एखादी movie आणि hotel मधे जेवण यापेक्षा किल्ले लाखपटीने बरे...
च्या मारी!!! हा ब्लॉग हलकट आहे, कारण इथे मराठीत काहीपण टाइप करणे हा साक्षात् वैताग, उच्छाद आणि ताप आहे!!!!
उरलेलं लिहिन नंतर तिच्यायला........