tag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post3067657293488339987..comments2023-08-15T04:48:38.423-07:00Comments on अवघा रंग एक झाला...: मुकुल शिवपुत्र- एक अनुभवAshwinhttp://www.blogger.com/profile/15435589057473934237noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-30492759996903947082011-02-10T07:30:06.741-08:002011-02-10T07:30:06.741-08:00विक्रांत,
हे मी माझ्या अनुभवावरून लिहिलं आहे. मुकु...विक्रांत,
हे मी माझ्या अनुभवावरून लिहिलं आहे. मुकुलजी जेव्हा गातात, तेव्हा असाच अनुभव मिळतो, कदाचित आपण कधी तो घेतला नसेल, आपण त्यांना कधी ऐकलं नसेल. माझं भाग्य थोर, मला मुकुलजींच्या अनेक अजोड मैफली ऐकायला मिळाल्या, कुठूनकुठून त्यांची recordings पण तुडुम्ब ऐकायला मिळाली.असो.
१) झाला प्रकार अत्यंत अप्रिय होता, आणि जेव्हा मला याची बातमी मिळाली तेव्हा मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो, आणि अजुनही आहे. वसंतोत्सवात जे काही झालं, त्याला मुकुलजींपेक्षाही इतर काही गोष्टी जबाबदार आहेत, पण मी त्यांचा उल्लेख इथे करू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व.
२) मुकुल शिवपुत्र सारखा गायक गेल्या कित्येक वर्षात भारतीय संगीताला मिळालेला नाही. त्यांचं ज्ञान, रागाबद्दल त्यांची समज, त्यांची विचारपद्धति केवळ अजोड आहे. आपल्याला केवळ त्यांचा लहरीपणा दिसतो हे दुर्दैव, पण मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की ही कृष्णभक्ति आणि छिद्रान्वेषण बाजूला ठेवून या गायकाची जडणघडण, त्याचा विचार, आणि त्याने आजवर मजसारिख्या अनेक पामरांना दिलेला निर्मळ आनंद आपण समजून घ्या. त्यांचं गाणं शांतपणे ऐका. कुठल्याही चौकटीत न बसणारा हा अजोड गायक आहे. त्यांच्या आणि त्यांच्यानंतरच्या पिढीत झालेल्या अभिजात नकलाकारांपेक्षा हा माणूस सहस्त्रपटीने श्रेष्ठ आहे!
३) मी आणि माझ्यासारखे अनेक आज मुकुलजींचे भक्त आहेत आणि हे सांगायला मला अभिमान वाटतो. आजही ते गाणार आहेत हे ऐकून आम्ही त्यांच्यामागे धावत जातो, आणि ते दोन मिनिटं गायले तरी आमचे कान धन्य होतात. असो. आपली मतं आपल्यापाशी.
वाचल्याबद्दल आभार, अजुन काय लिहू?Ashwinhttps://www.blogger.com/profile/15435589057473934237noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4195930003859200783.post-89419638111101709582011-02-10T05:16:26.921-08:002011-02-10T05:16:26.921-08:00अहो पण परवा यांनी वसंतोत्सवात केलेल्या फजितीचं काय...अहो पण परवा यांनी वसंतोत्सवात केलेल्या फजितीचं काय?Anonymoushttps://www.blogger.com/profile/16228031184843757428noreply@blogger.com